भूमिका…
काळ बदलला तसं पत्रकारिता क्षेत्र बदलत चालले आहे. काळाची गतीमान पावलं ओळखून आम्ही online पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहोत. सायं दैनिक, आकाशवाणी या माध्यमातील प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर हे पाऊल उचललं आहे. इंग्रजी, हिंदी पत्रकारितेने यापूर्वीच या माध्यमात गती घेतली आहे. मराठी भाषिक वाचक देखील याकडे वळताना दिसतोय.
ही गरज ओळखून पारंपरिक विषयांसह वाचकांना नावीन्यपूर्ण आणि काळानुरूप जे जे देता येईल ते ते देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
बातमी, बातमीचं विश्लेषण करताना वास्तववादी पत्रकारितेची कास धरू.
निश्पक्ष, पारदर्शक आणि संतुलित पत्रकारिता हे आमचे तत्व असेल. वाचकांना चालू विषयांवर ज्ञात करण्यासाठी विविध विषयांवरील लेखन उपलब्ध करून देण्यात येईल.
वाचकांना बातमी शिवाय विविध सामाजिक विषयांवरील लेखन उपलब्ध होईल. म्हणूनच आमच्या संकेतस्थळावर विविध शिर्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वाचक आपल्या अभिरूची प्रमाणे या संकेतस्थळाची सफर करेल असा विश्वास वाटतो.
आपल्याला काय वाटतं? कोणत्या विषयावर लेखन अपेक्षित आहे त्याबाबत सूचना स्वागतार्ह आहेत.
यासाठी आपण खालील इ मेल वर संपर्क करू शकता….
crosslinenews1976@gmail.com