नांदेड- रत्नागिरी येथे २८ फेबुवारी ते २ मार्च दरम्यान आयोजीत राज्यस्तर १० वर्षाखालील १३ वर्षाखालील व १५ वर्षाखालील मुले व मुलीच्या वयोगटात इंडीयन , रिकव्हर , व कम्पाउंड प्रकाराच्या जिल्हास्तर निवड चाचणीचे आयोजन २२ फेबुवारी रोजी आर्चरी स्कुल श्री गुरू गोबिंदसिघजी स्टेडीयम नादेड येथे सकाळी १० वाजता जिल्हासचिव वृषाली पाटील जोगदंड याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असुन जिल्ह्यातील जास्तीत धर्नुधरानी सहभाग नोंदविण्याचे आवाहन संघटना कार्याध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी
केले आहे .
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत रत्नागिरी धनुर्विद्या संघटनेच्या वतिने डेरवन येथे १५ वर्षाखालील मुले मुली वयोगटात रिकव्हर व कम्पाऊंड प्रकारासाठी (४० मिटर) इंडीयन साठी (३० मिटर)
१३ वर्षाखालील वयोगट मुले मुली रिकव्हर व कंम्पाऊड राऊंड (३० मिटर) इंडीयन (२० मिटर)
१० वर्षाखालील मुले मुली रिकव्हर व कम्पाउंड (२०मिटर ) इंडीयन राऊंड (१५ मिटर ) असणार असून १० व १३ वर्षे वयोगटात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना हैद्राबाद येथे आयोजीत राष्ट्रीय स्पर्धेत थेट सहभाग देण्यात येणार आहे.
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी जिल्हास्तर निवड चाचणीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे